#Chandrapur
• चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधकाम संघटना कृती समितीचे धरणा आंदोलन!
• आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कामगार बांधव उपस्थित!
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मंगळवारी दुपारी 11 वाजता बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने धरणा आंदोलन करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्हा सुविधा केंद्र त्वरित उभारून नोंदणीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, विनाकारण नोंदणी अधिकारी मार्फत नोंदणीचे रिनिव्हल व लाभाचे अर्ज रिजेक्ट करण्यात येत आहे त्याबाबत नोंदणी अधिकारी यांना 03सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या समन्वयाच्या बैठकी प्रमाणे समज देण्यात यावी या दोन मागण्यांसह अन्य सहा आवश्यक मागण्यांसाठी मंगळवारी कृती समितीच्या वतीने धरणा आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कामगार बांधव सहभागी झाले होते.सदरहु
आंदोलन यशस्वी करण्याकरीता प्रमोद गोडघाटे, राजेश पिंजरकर, अरुण भेलके,किशोर जामदार, विद्या निब्रड,अविनाश वाळके, सुरेन्द्र ढोकणे, शशीकांत मेश्राम, कविता गौरकार, आदिंनी अथक परिश्रम घेतले.
संध्याकाळी एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्त यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले.

