#chandrapur
• गुरु तत्त्व आणि समर्पण ध्यानयोग शिबिराचे भव्य आयोजन – महाराष्ट्र पोलीस आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्यातर्फे संयुक्त उपक्रम
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर, तुकुम | दिनांक 4 ऑक्टोबर 2025 समाजात अध्यात्मिक जागृती, मानसिक शांतता आणि आत्मिक उन्नती साध्य करण्याच्या उद्देशाने श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन आणि महाराष्ट्र पोलीस, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “गुरु तत्त्व – समर्पण ध्यानयोग शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरात सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींची प्रत्यक्ष उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र ध्यानयोगाचे महत्त्व व अनुभव उपस्थित साधकांना मिळणार आहे.
या शिबिराचे आयोजन 4 ऑक्टोबर 2025, सकाळी ७:३० ते ९:३० दरम्यान पोलिस मुख्यालय परेड ग्राउंड, तुकुम, चंद्रपूर येथे होणार आहे.
समग्र ध्यानयोग हा केवळ ध्यानाचा एक प्रकार नसून, तो जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा प्रवास आहे. आत्मिक उन्नतीसह मानसिक स्थैर्य, शरीरसंपदा आणि सामाजिक समरसता यांचे संपूर्ण समायोजन यातून साध्य होते. “वसुधैव कुटुंबकम” या भावनेला मूर्त स्वरूप देणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचा प्रसार करतो.
या आध्यात्मिक महायात्रेचा भाग होण्यासाठी सर्व नागरिकांना सादर आमंत्रण दिले जात आहे. आपल्या उपस्थितीने हे शिबिर अधिक फलदायी आणि प्रभावी ठरेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

