#Varora
• शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी __ वरो-यात खा. प्रतिभा धानोरकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन!
• आंदोलनाने वेधले अनेकांचे लक्ष
• आंदोलनात झाले हजारों शेतकरी बांधव स्वयंस्फूर्तीने सहभागी !
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
#वरोरा : शेतकरी व जनतेच्या न्याय हक्कासाठी आज शुक्रवारला वरो-यात असंख्य शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत व काॅंग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात नागपुर-चंद्रपुर महामार्गावर “चक्काजाम आंदोलन” करण्यात आले.
अतिवृष्टी मुळे महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आला आहे, कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, पण तरीही महायुती सरकार मात्र फक्त मोठमोठ्या वल्गना करून रिकाम्या आश्वासनांची फसवी नाटके करीत आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपाने जाहीरनाम्यात केलेली “सातबारा कोरा… कोरा… कोरा…” ही घोषणा साफ खोटी ठरली आहे . सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करा. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देऊन कापूस उत्पादकांना ₹१ लाख हेक्टरी, तर सोयाबीन उत्पादकांना ₹५० हजार हेक्टरी नुकसान भरपाई शासनाने तातडीने द्यावी. अशी ठाम भूमिका या आंदोलनातून आज घेण्यात आली .
यावेळी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई रजा, वरोराचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, भद्रावतीचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, वरोराचे शहराध्यक्ष विलास टिपले, भद्रावतीचे शहराध्यक्ष सूरज गावंडे, राजूभाऊ चिकटे, विशाल बदखल, ऐश्वर्या खामनकर, संध्या पोडे, दिपाली माटे, सरीता सूर यांच्यासह काँग्रेसचे सर्व जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तालुक्यातील शेतकरी बांधव, व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित झाले होते.
आजच्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते हे मात्र तितकेच खरे!

