Home Breaking News • महसूल विभागाच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी पुढे यावे; १९ जूनच्या बैठकीपूर्वी सूचना पाठविण्याचे...

• महसूल विभागाच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी पुढे यावे; १९ जूनच्या बैठकीपूर्वी सूचना पाठविण्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन • अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

11

• महसूल विभागाच्या प्रश्नांसाठी नागरिकांनी पुढे यावे; १९ जूनच्या बैठकीपूर्वी सूचना पाठविण्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

• अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : महसूल विभागाशी संबंधित प्रश्न, अडचणी व धोरणात्मक बाबी शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांच्या पुढाकारातून महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची १९ जून रोजी चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे होणाऱ्या या बैठकीत जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून प्रलंबित प्रकरणे, धोरणात्मक अडचणी, जमिनीशी संबंधित तक्रारी, नोंदणी, फेरफार, नामांतरण यांसारख्या विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

बैठकीत नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जावेत यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. महसूल विभागाशी संबंधित समस्या, सूचना किंवा धोरणात्मक मुद्दे नागरिकांनी स्वीय सहायक श्री. संजय राईंचवार यांच्या ९५५२७९९६०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन करून महत्त्वाचे प्रश्न अपर मुख्य सचिवांच्या बैठकीत मांडले जाणार आहेत. त्यावर आवश्यक ती कार्यवाही करून संबंधित विभागांकडून प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

महसूल विभागाशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची संधी असून नागरिकांनी वेळेत आपल्या तक्रारी व विधायक सूचना पाठवून प्रशासनाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.