Home Breaking News वरोऱ्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर धाड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सव्वादोन लाखांचा...

वरोऱ्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर धाड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

9

वरोऱ्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूवर धाड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

वरोरा :- वरोरा येथील सरदार पटेल वार्ड भागात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच, चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या धाडीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीची माहिती :-
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुभाष श्रीहरी वरभे (वय ५६, रा. सरदार पटेल वार्ड, वरोरा) याला ताब्यात घेतले आहे.
जप्त केलेला मुद्देमाल
पथकाने केलेल्या तपासणीमध्ये लाखो रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
होला हुक्का प्रतिबंधित सुगंधी तंबाखू ४६ नग (१ किलोचे पाऊच) – किंमत ६०,९५० रुपये.
इगल हुक्का प्रतिबंधित सुगंधी तंबाखू २७ नग (१ किलोचे पाऊच) – किंमत ५६,०२५ रुपये.
मजा १०८ हुक्का प्रतिबंधित सुगंधी तंबाखू ११० नग (टिनचे डब्बे) – किंमत १,२४,३०० रुपये.
असा एकूण २ लाख ४१ हजार २७५ रुपयांचा प्रतिबंधित माल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस कारवाई
सदर प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ७४१/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत. (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.