Home Breaking News #Varora • चक्क मालात सोडले जनावरे चरायला

#Varora • चक्क मालात सोडले जनावरे चरायला

64

#Varora
• चक्क मालात सोडले जनावरे चरायल

सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा : केम येथील शेतकरी अविनाश गुलाबराव पावडे या गावातील तरुण यांनी नौकरी चा शोध घेतला पण शेतकरी डोनेशन भरायला पैसे कुठून आणणार हा प्रश्न पडल्याने त्यांनी नौकरी वर पाणी फेरले आणि आपल्या वडिलोपार्जित शेती करायला मागील पाच वर्षा पासून सुरुवात केली
या वर्षी त्यांनी आपल्या शेतात 12 एकर सोयाबीन आणि वडील व लहान भावाच्या नावाने असलेल्या शेतीत कापूस लावला.
सुरुवातीला पाऊसाने साथ दिल्याने सोयाबीन पीक जोमात आले मात्र आगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन पीक हे पूर्ण पणे खराब झाले
त्यामुळे ते लेबर लावून कापायला आणि हार्वेस्टिंग करायला परवडत नाही म्हणून चक्क बकऱ्या सोयाबीन पिकात चरायला सोडल्या