• जिवती ते येल्लापुर रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावे: सुबोध चिकटे
• रस्त्याची अत्यंत दुर्देवी अवस्था
सुवर्ण भारत |पंकज रामटेके सहाय्यक : जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
जिवती – सतत च्या पावसामुळे जिवती ते येल्लापुर या मार्गावरील रसत्यावर मोठ मोठे गड्डे निर्माण झाले आहे. या मार्गावरती अधिक वाहणांची दळन वळन आहे कारण जिवती तालुक्यातील नागरिक येल्लापुर मार्गाने तेलंगाना आदिलाबाद कडे जातात या मार्गाने आधिक मोठ्या प्रमाणात मोठ्या छोट्या गाड्यांची वाहतुक होते या मार्गावरती गुडग्याइतके मोठ-मोठे खड्डे पडले आहेत या पार्श्वभूमीवर तातडिने खड्डे बुजवावेत अशी मांगणी आमदार देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजप युवा मोर्चा अनुसूचित जाति जिल्हाअध्यक्ष सुबोध चिकटे यानि सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपुर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.आमदार देवराव भोंगळे यांनि यासंदभात प्रशासनाला दुरध्वनीद्वारे सुचना दिल्या आहेत. जिवती तालुक्यातील अनेक रसत्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असुन ते त्वरित बुजवुंन नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती सुबोध चिकटे यानि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आनी बाधकाम विभागाच्या आधीकार्यांशि चर्चेदरम्यान केली आहे.नागरीकांना या खड्ड्यांमुळे गाडी चालवतांना थरकाप उडत आहे.नागरीकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत आणी सुरक्षित प्रवासाची खात्री द्यावी.अशी मांगणी केली आहे.निवेदन सादर करताना विकास सोनकांबळे बालाजी कांबळे विनायक श्रीसागर,
*चौकट*
महाराष्ट्र व तेलंगाना राज्याला जोडणारा कमी अंतराचा मार्ग म्हणून जिवती-येल्लापुर-मेडीगुडा -आदिलाबाद या मार्गाची ओळख आहे तालुक्यातिल इतर मार्गाच्या तुलनेत या मार्गावर दरोरज शकडो वाहनांची वर्दळ असते येल्लापासुंन तेलंगनासिमेपर्यंत दोंन किमी अंतरावर जिव घेणे खड्डे पडले आहेत.ते तातकाळ बुजवावे

