• आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे महात्मा गांधीजींना अभिवादन
सुवर्ण भारत | पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस: येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’ नारा देऊन देशवासीयांत चैतन्य फुंकणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव विनोद चौधरी, आकाश निभ्रड, धनराज पारखी, असगर खान, संदीप तेलंग, हेमंत कुमार, गणेश राजुरकर, निखिल आत्राम, सौरभ कागदेलवार, भारती परते, प्रिया नाभिडकर व जाई आत्राम आदींची उपस्थिती होती.

