
• मायाताई कोसरे व दत्तात्रय समर्थ मुलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात हजर !
• मंदिर नासधूस प्रकरणात केली होती श्रीलता व तिरुपती कनकटीच्या विरुद्धात
कोसरे व समर्थ यांनी तक्रार दाखल !
सुवर्ण भारत | किरण घाटे : विशेष प्रतिनिधी
मुल : मुल तालुक्यातील जानाळा येथील भुतेश्वर महादेव मंदिराच्या नासधूस प्रकरणात चौकशी आरंभ झाली असून शुक्रवार दि.3 ऑक्टोबरला आपले म्हणणे मांडण्यासाठी हजारों महिलांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व मूलचे समाजसेवक दत्तात्रय समर्थ हे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर झाले.
दरम्यान या प्रकरणात संबंधित गावच्या पटवा-याचा व मंडळ अधिका-यांचा चौकशी अहवाल मुल तहसिलदार यांना प्राप्त झाला आहे.
जानाळा येथील मुळ रहिवाशी असलेल्या मायाताई कोसरे यांनी उपरोक्त प्रकरणात मुल पोलिस स्टेशनला देखील तक्रार दाखल केली होती.त्या नंतर त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली होती.
समर्थ यांच्या कडे वरिल प्रकरणात कोसरे यांची तक्रार येताच त्यांनी कुठल्याही वेळेचा विलंब न लावता थेट वरिष्ठांकडे आपल्या संघटनेच्या माध्यमातून लेखी तक्रार दाखल करुन सतत या प्रकरणाचा पाठपुरावा पुरावा केला होता.हे विशेष! याच अनुषंगाने मूलचे उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणाच्या संदर्भात कोसरे व समर्थ यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी उपविभागीय कार्यालयात हजर राहण्याचे नोटीस बजावले होते.
मायाताई कोसरे यांची जानाळा येथे शेतजमीन होती.ही शेतजमीन भंडारा येथील श्रीलता कनकटी व तिरुपती क्रिष्टया कनकटी यांना विकली होती.विक्री दरम्यान या शेतजमीनी मधील अस्तित्वात असलेले भुतेश्वर महादेव मंदिर व काही जमीन माझ्या ताब्यात राहील असे बक्षीस पत्र कोसरे यांनी १००रुपयांच्या स्टॅंप पेपरवर श्रीलता व तिरुपती कनकटी यांचे कडून लिहुन घेतले होते.त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समर्थ यांनी सांगितले.
मायाताई कोसरे ह्या सध्या नागपूर मुक्कामी राहात असून उपरोक्त मंदिराची देखरेख व अधूनमधून मंदिरात पुजा अर्चना करीत असतात.महाशिवरात्री व अन्य
सणासुदीच्या दिवसांत कोसरे ह्या
मंदिरात पूजेसाठी येत असतात.
अनेक वर्षांपासून हे मंदिर असून अनेक भाविक श्रद्धेने या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
महाशिवरात्रीला या मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे तेथील
गावकरी मंडळींने सांगितले.
अनेकांचे श्रध्दास्थान असलेल्या या भुतेश्वर महादेव मंदिरात आपणही अधुन मधुन दर्शनासाठी जात असल्याचे चंद्रपूर निवासी जेष्ठ
योगशिक्षक रमेश ददगाल यांनी सांगितले.उपराजधानी नागपूरच्या योगशिक्षिका तथा समाजसेविका मायाताई कोसरे यांनी सदरहु प्रकरणात योग्य न्याय मिळावा यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली असून त्या संदर्भात त्या नागपूर व चंद्रपूर येथील नामवंत वकिलांचा सल्ला घेत असल्याचे त्यांनी आज सांगितले.

