⬜🟥🟧चारित्र्यता 🟩🟥🟨
मानवात असभ्यता हा गुण ज्यात असते त्याला दुसर्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे
उडवायला खूप आवडते!!
कर्तव्याचे गुण सभ्यतेने असले की चारित्र्य गुण मार्गदर्शन करते. केव्हाही बघा एकदाचे आपण परिश्रमाने खचणार नाही पण चांगले कार्य करतांना कुणी वाईट बोलले तर खचून जातो.. माणसास अकारण विचार करायला लावतो. त्यासाठी संयम आणि आत्मविश्वास खंबीर असले की कुणी आपल्या चारित्र्यावर बोलले लक्ष द्यायचे नसते प्रत्येकाची हीच भावना असली की इतिहास बदलू शकतो. स्त्री असो वा पुरुष चारित्र्याची परीक्षा असतेच. आपलं नशीब आपल्याला नशीबवान संधी मिळवून देते…. संधी निर्माण झाली की तो बुद्धीवान संधीचं सोनं करतो आणि कर्तृत्ववान म्हणून कार्य करतो. यात स्त्री जरी असली तरी तिला या कार्यातून जातांना आपला स्वभाव म्हणजे एक अलंकार म्हणून जपावा लागतो.
कुणाच्या चारित्र्यावर संशय घेतांना शब्दाला शब्द घासले तर वाद होतो… आपण आपल्या परिवारासाठी सुखासाठी आनंदाने झटत असतो परंतु एखाद्या स्त्रीने पुरुषा वर किंवा पुरुषाने स्त्रीवर आकर्षणाच्या नादात आपलं खरं नातं जोडतांना थोडं पलीकडे बघणं सुद्धा महत्वाचे असते. आपल्या आकर्षणाच्या नादात कधी कधी आपलाच बळी पडतो यातच आपला अनुभव असतो. एक शिकवण देवून जातो. आयुष्यात स्त्रीला असो वा पुरुषाला जिंकायचे असेल तर टिका आणि निंदकाकडे दुर्लक्ष करावे लागते.
म्हणून वादळात निडर आणि संघर्षातमन स्थिर ठेवावे लागते…
🟧सौ. शैला चिमड्यालवार
सहज सुचलं मार्गदर्शिका सावली

