Home Breaking News #Nagbhid • चिखलगाव ते कन्हाळगाव फाटा मार्गाची अत्यंत दुर्दशा

#Nagbhid • चिखलगाव ते कन्हाळगाव फाटा मार्गाची अत्यंत दुर्दशा

57

#Nagbhid
• चिखलगाव ते कन्हाळगाव फाटा मार्गाची अत्यंत दुर्दशा

सुवर्ण भारत : निरंजन बोरकर
तालुका प्रतिनिधी, नागभिड

नागभिड  : मुसळधार पावसामुळे नागभिड तालुक्यातील चिखलगाव नांदगाव कन्हाळगाव फाटा मार्गाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे.या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून दरम्यान पावसाळाभर या खड्ड्यांमध्ये पाणि साचून राहत असते.

परिणामी तोल जाऊन अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.या रस्त्यावर जागोजागी खड्डे आणि मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे आणि कसरतीचे काम झालेले आहे.

या बाबींकडे जाणिवपूर्वक संबंधित लोकप्रतिनिधी आणि विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसते. हा नवरगाव चिमूर ला जोडणारा मार्ग असून नागपूर नागभिड मार्गांनी येणारी जड वाहने याच मार्गाने जात असतात. येथिल आजुबाजुला असणारे खेडे यांचा तळोधी आणि नवरगाव या बाजारपेठेत व्यवहार होत असल्याने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे