Home Breaking News #Chandrapur • शिक्षणात कलांचा सुंदर आविष्कार करणाऱ्या ठाण्याच्या विद्या शिनगारे

#Chandrapur • शिक्षणात कलांचा सुंदर आविष्कार करणाऱ्या ठाण्याच्या विद्या शिनगारे

84

#Chandrapur

• शिक्षणात कलांचा सुंदर आविष्कार करणाऱ्या ठाण्याच्या विद्या शिनगारे

सुवर्ण भारत :प्रियंका गायकवाड

चंद्रपूर : आपल्याकडे असलेल्या विविध कला त्यांचा यथार्थ उपयोग करून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या ठाण्याच्या विद्या राजाराम शिनगारे गेली पंधरा वर्षे दिवा येथील एस. एम. जी. विद्यामंदिर विद्यालयात एक सहशिक्षिका म्हणून अत्यंत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
त्यांनी बी. ए. आणि डी. एड. पर्यंत शिक्षण घेतले आहे. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख फक्त शैक्षणिक पात्रतेपुरती मर्यादित नसून, त्यांच्या बहुआयामी कलागुणांमध्ये दडलेली आहे.

काव्यलेखन, नृत्य, गायन, अभिनय सादरीकरण, चित्र रेखाटन, सूत्रसंचालन अशा अनेक कलांमध्ये त्यांना विशेष रस व रुची आहे.

या कलांचा उपयोग त्या आपल्या अध्यापन प्रक्रियेत करत असल्यामुळे त्यांच्या वर्गातील शिकवणी हा विद्यार्थ्यांसाठी केवळ धड्यांचा प्रवास न राहता एक आनंददायी अनुभव ठरतो.
त्यांच्या शिकवणीमध्ये गाण्याचा सूर, अभिनयाची छटा, चित्रांची रंगत आणि कवितेची लय यांचा समन्वय आढळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विषयात खोलवर गुंतते आणि ज्ञान आत्मसात करणे त्यांच्यासाठी सहज आणि आनंददायी होते.

विद्या शिनगारे यांची काव्यप्रतिभा विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या कविता वर्ल्ड व्हिजन, सायबर क्राईम, न्यायप्रभात यांसारख्या वृत्तपत्रांत सातत्याने प्रकाशित होत असतात. तसेच विविध साहित्यिक समूहांतूनही त्यांनी काव्यलेखन केले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाण, संवेदनशीलता आणि अभिव्यक्तीचा गोडवा दिसून येतो.

शाळेत अध्यापन करताना त्या विद्यार्थ्यांना नेहमीच ऍक्टिव्ह, जिज्ञासू आणि आनंदी ठेवण्यावर भर देतात. त्यामुळे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, मनोरंजनात्मक खेळ व सर्जनशील कृती यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिकवणे हा त्यांचा खास दृष्टीकोन आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे प्रत्येक विद्यार्थी विषयाशी नाते जोडतो आणि शिक्षण हा एक जीवनोत्सव असल्याचा अनुभव घेतो

विद्या शिनगारे म्हणजे एक गुणी सहशिक्षिका, एक कल्पक कवयित्री आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत . त्यांच्या कष्टातून व कलागुणांतून उलगडलेले शिक्षणाचे हे मॉडेल इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

विद्या शिनगारे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या एक जेष्ठ सदस्य असून त्यांच्या काव्यरचनेचा दर्जा उत्तम व साजेसा असतोय! त्या काव्यकुंजच्या एक नियमित कवयित्री आहेत.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पार पडलेल्या कविसंमेलनात त्यांनी आपला सहभाग नोंदविला असून अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.नवोदित कवयित्रींना त्या खरोखरच प्रेरणादायी आहे.