#Sindevahi
• राजू सिडामला गळा चिरून केले ठार; १५ दिवसांनी उघडकीस आले धक्कादायक प्रकरण !
सुवर्ण भारत | पंकज रामटेके : सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
#सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी गावात दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या वादातून राजू आनंदराव सिडाम याचा धारदार चाकूने गळा चिरून खून करण्यात आला.
ही घटना १५ दिवसांनी म्हणजे दि.१९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
तपासा अंती कळले की सकाळी झालेल्या वादानंतर आरोपी महेंद्र भोजराज पारधी आणि मयूर रामदास वाघमारे हे राजुला धमकवण्यासाठी सायंकाळी त्याच्या घरी गेले. वाद पुन्हा वाढल्यावर महेंद्र संतापला व धारदार चाकूने राजूच्या गळ्यावर त्याने सपासप वार केले.
त्या वेळी मयूरने त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु महेंद्रने त्यालाही धमकावले. झटापटीदरम्यान भांडे पडल्याचा आवाज झाला आणि दोघांनी जखमी राजुला मधल्या खोलीत खेचून पोटात वार केले. तेव्हा राजू जागीच मृत्यू पावला.
घटनेच्या आधी राजूचा मित्र रवी उर्फ लाडू गरमाडे (३१, रा. मोहाळी) हा देखील उपस्थित होता. संशयावरून पोलिसांनी त्यालाही अटक केली, परंतु तपासात त्याचा खूनप्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी महेंद्र भोजराज पारधी (वय 26 वर्ष) आणि मयूर रामदास वाघमारे(वय 24वर्ष) यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयात हजर केले असता त्यांना P.C.R.
(पोलीस कोठडी रिमांड) देण्यात आला आहे.उपरोक्त धक्कादायक घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन आणि पोलीस निरीक्षक कंचन पांडे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई यशस्वी झाली.
तपास पथकात दर्शन लाटकर, संजय जुमनाई, आफताब शेख, हत्ताजी रामरेडे, नारायण येगेवार, सुनिल डोंगरे,आणि मधुकर आत्राम यांचा समावेश होता. सदरहु घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली होती.हे मात्र तेवढेच खरे आहे.

