Home Breaking News #Chandrapur • भव्य पक्षप्रवेश व शाखा उद्घाटन सोहळ्याने महाकाली कॉलरी परिसरात मनसेची...

#Chandrapur • भव्य पक्षप्रवेश व शाखा उद्घाटन सोहळ्याने महाकाली कॉलरी परिसरात मनसेची ताकद गगनात

56

#Chandrapur
• भव्य पक्षप्रवेश व शाखा उद्घाटन सोहळ्याने महाकाली कॉलरी परिसरात मनसेची ताकद गगनात

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाकाली कॉलरी, प्रकाश नगर येथे दिनांक १० ऑक्टोबर रोजी मनसेच्या नव्या शाखेचे उद्घाटन तसेच भव्य पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला.

कार्यक्रमाचे उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार आणि चंद्रपूर शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील शेकडो युवकांनी राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अधिकृत प्रवेश केला.

ज्येष्ठ नेते किशोर मडगुलवार हे दीर्घकाळापासून सामाजिक कार्यात सक्रीय असून, त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य सामाजिक बांधिलकीसाठी वापरत एक प्रेरणादायी उदाहरण समाजापुढे ठेवले. नागरिकांच्या न्यायहक्कासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

या सोहळ्याला मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदणखेडे, मनोज तांबेकर, महिलासेना तालुकाध्यक्ष कल्पना पोर्तलावार, तसेच प्रकाश नागरकर, वर्षा बोमले, आशिष नैताम, प्रवीण शेवते, कृष्णा गुप्ता, मयूर मंदनकर, राजू देवांगण, साहील पठाण आदी पदाधिकारी आणि असंख्य मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष सचिन भोयर यांनी सांगितले, “विकास हवा असेल, तर आता मनसेशिवाय पर्याय नाही. राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नव्या महाराष्ट्राचे स्वप्न साकार करूया.” तर जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत, “मनसे तुमच्या प्रत्येक समस्येच्या समाधानासाठी कटिबद्ध आहे,” असे ठाम वक्तव्य केले.

हा कार्यक्रम केवळ पक्षवाढीचा नव्हे तर एकजुटीचा, विचारांचे प्रबोधन करणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. आगामी काळात मनसेची ताकद अधिक बळकट होणार यात शंका नाही.