#Bhadravti
• श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात विभागीय बॉक्सिंग विजेता विधाता लांडगे यांचा गौरव
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर | भद्रावती
येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री. संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात, भद्रावतीतील नाभिक समाजाचे उदयोन्मुख बॉक्सिंग खेळाडू विधाता बंडू लांडगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे व विभागीय क्रीडा अधिकारी, नागपूर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत विधाताने उत्कृष्ट कामगिरी करत नागपूर विभागात अव्वल क्रमांक पटकावला.
विधाता लांडगे सध्या यशवंतराव शिंदे महाविद्यालयात शिक्षण घेत असून, १९ वर्षांखालील गटात त्याने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत विभागीय विजेतेपद मिळवले आहे. आता तो राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे, ही भद्रावतीसाठी आणि संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
या गौरव सोहळ्यात डॉ. निवृत्ती पिस्तुलकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्या आर्णी, मंडळ अधिकारी समिर वाटेकर (तहसील कार्यालय, भद्रावती), ऑड. सुनील नामोजवार (भाजपा शहर अध्यक्ष), प्रफुल्ल चटकी (माजी उपनगराध्यक्ष), सुधीर सातपुते (माजी नगरसेवक), रमेश हणुमंते (प्रभु सेवा संस्था अध्यक्ष, चंद्रपूर) तसेच ज्योतिताई लांडगे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान, संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीने व सर्व समाजबांधवांनी विधाता लांडगे याचा यथोचित सत्कार करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशाचा अभिमान व्यक्त करत त्याला अधिक उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा देण्यात आली..

