#Jivti
• शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पाटण येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत : कृष्णा चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
#जिवती : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत आयोजित तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पाटण येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन सोहळा १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोलिस ठाणे पाटणचे ठाणेदार सुधाकर कोकोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून रूपाली मोगरकर (तहसीलदार, जिवती) उपस्थित होत्या. कार्यक्रमाला डी. के. टिंगूसले (सहा. प्रकल्प अधिकारी – प्रशासन), राजीव बोंगिरवार (सहा. प्रकल्प अधिकारी – शिक्षण), डॉ. कविता शर्मा (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण), युवराज चव्हाण (कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी) आणि वासुदेव राजपुरोहित (मुख्याध्यापक, आश्रमशाळा पाटण) हे मान्यवरही उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये जिवती, बोर्डा, देवाडा व देवई या चार केंद्रांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण ९६० विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव राजपुरोहित यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद, कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले.
या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली असून अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध होत आहे.

