Home Breaking News राजकीय रणसंग्रामाची चाहूल! भोयगाव–आवारपूर क्षेत्रात पुरुष उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू

राजकीय रणसंग्रामाची चाहूल! भोयगाव–आवारपूर क्षेत्रात पुरुष उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू

122

राजकीय रणसंग्रामाची चाहूल!
भोयगाव–आवारपूर क्षेत्रात पुरुष उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू

कोरपना तालुका प्रतिनिधी मनोज गोरे (चंद्रपूर)

कोरपना, ता.१३ :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून, कोरपना तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. काही ठिकाणी आरक्षणातील उलथापालथ झाल्याने नवे राजकीय समीकरण तयार होत असून, अनेक नेत्यांची गणिते कोलमडली आहेत.
विशेष म्हणजे भोयगाव–आवारपूर जिल्हा परिषद क्षेत्र हे यावेळी सर्वसाधारण ठरल्याने पुरुष उमेदवारांची चुरस प्रचंड वाढली आहे. या मतदारसंघात अनेक नावाजलेले उमेदवार आपले वर्चस्व सिद्ध करण्यास सज्ज झाल्याचे दिसते.
जिल्हा परिषद क्षेत्र आरक्षण
१) भोयगाव – आवारपूर — सर्वसाधारण
२) उपरवाही – नांदा — नामाप्र महिला
३) वनसडी – कोळशी बुद्रुक — सर्वसाधारण महिला
४) परसोडा – येरगव्हाण — अनुसूचित जमाती महिला
पंचायत समिती क्षेत्र आरक्षण
१) भोयगाव — सर्वसाधारण महिला
२) आवरपूर — अनुसूचित जाती स्त्री
३) नांदा — सर्वसाधारण
४) उपरवाही — सर्वसाधारण
५) वनसडी — नामाप्र महिला
६) कोडशी बूज — नामाप्र
७) परसोडा — अनुसूचित जमाती महिला
८) येरगव्हाण — अनुसूचित जमाती
आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे.
काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या शुभेच्छानी गावे गजबजली असून, तर काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
विशेषत: भोयगाव–आवारपूर या बहुचर्चित क्षेत्रात पुरुष उमेदवारांची रस्सीखेच तीव्र होत असून, यंदा येथे ‘हायव्होल्टेज’ लढत होण्याची चिन्हे आहेत.
दिवाळीपूर्वीच राजकीय रंगत वाढली असून, सर्वच पक्षांमध्ये उमेदवार निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत कोरपना तालुक्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गाव खेड्यांमध्ये उमेदवारांच्या नावांची चर्चा चौकात चौकात सुरू आहे अनेकांची इच्छा असतानाही पक्षश्रेष्ठीं कडे अनेकानी उमेदवारी करिता इच्छुक असल्याचे दर्शविले असले तरी अखेर पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उमेदवारांची माळ घालतील हे मात्र येणारी वेळच ठरणार आहे.