Home Breaking News • पारडी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश...

• पारडी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश • लोकाभिमुख कार्य हाच भाजपा सरकारचा अजेंडा — आमदार देवराव भोंगळे

164

• पारडी येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

• लोकाभिमुख कार्य हाच भाजपा सरकारचा अजेंडा — आमदार देवराव भोंगळे

सुवर्ण भारत : रवीकुमार बंडीवार, प्रतिनीधी

कोरपना : देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष हा एकमेव लोकाभिमुख पक्ष असून, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरीब व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू आहे. या लोककल्याणकारी धोरणांमुळे समाजातील सर्व स्तरांतील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत, असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील पारडी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. या नवप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण होईल आणि विकासकामांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास आमदार भोंगळे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जिल्हा सचिव विनोद चौधरी, माजी जिल्हा परिषद सभापती निता चौधरी, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, राजुरा शहर महामंत्री सचिन भोयर, तसेच अर्चना भोंगळे, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी, दिनेश खडसे, कार्तिक गोंलावार, जगदीश पिंपळशेंडे, अमोल आसेकर, प्रमोद कोडापे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये गजानन गोहणे, सुनीता गोहणे, संदीप गोहणे, महादेव गोहणे, सुमित्राबाई गोहणे, जगन गोहणे, उज्ज्वला गोहणे, अशोक गोहणे, शंकर सहारे, सुनंदा सहारे, श्रावण सहारे, गंगाधर सहारे, प्रीतम राऊत, पंकज राऊत, बाबाराव नागोसे, अतुल माथनकर, शुभम गावंडे, सुरेश इटकलवार, वंदना इटकलवार, श्रीधर गावंडे, गुणवंत गावंडे, मारोती आत्राम, दयाकर पवार, ईश्वर उदार, गोपाल उदार, मनोज बोरकर, दिनेश बोरकर, सचिन महल्ले, प्रमोद महल्ले, विपिन ढोके, देविदास शेंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवप्रवेशितांचे स्वागत केले.