Home Breaking News जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांनी केले पाल व चापले कुटुंबीयांचे सांत्वन

जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांनी केले पाल व चापले कुटुंबीयांचे सांत्वन

324

जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांनी केले पाल व चापले कुटुंबीयांचे सांत्वन

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी – कृष्णा चव्हाण

गोंडपिपरी :– गोंडपिपरी तालुक्यातील मौजा चकपीपरी

Oplus_16908288

येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत शेतकरी भाऊजी पाल यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पाल कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुःखाच्या या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी पाल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही केली व कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य व मदत मिळवून देण्याचा दिलासा दिला.
दरम्यान, गणेशपिपरी येथील काँग्रेस कार्यकर्ते विकास चापले यांचा मुलगा प्रणय चापले यांचा अल्प आजाराने मृत्यू झाल्याची दुःखद वार्ता समजताच जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांनी चापले कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दिवाळी सारख्या पावन पर्वावर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू संपूर्ण कुटुंबियांवर मोठा आघात असतो याची जाणीव असलेले सुभाषभाऊ यांनी दोन्ही मृतक कुटुंबीयांचे सांत्वन करून दुःखाच्या या कठीण समयी मायेचा ओलावा आणि धीर दिला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर, माजी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते देवेंद्र बट्टे, अजय माडुरवार, शहराध्यक्ष राजु झाडे, महिला तालुकाध्यक्ष सोनीताई दिवसे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौतम झाडे, सुरज माडुरवार, लटारू चापले, धर्मराव पोटे, बालाजी चणकापुरे, राहुल लडके, अनिल कोरडे, माधव लडके, अमित भरकडे, गणेश भोगेकर, महेंद्र कुनघाडकर, नरेश नागापुरे, सारनाथ बस्की, आशिष निमगडे, भडकेताई यासह गोंडपिपरी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.