Home Breaking News #Nagpur • “ते”अवैध दारुचे व्यवसाय बंद करा – ज्वाला धोटेंची नागपूरच्या...

#Nagpur • “ते”अवैध दारुचे व्यवसाय बंद करा – ज्वाला धोटेंची नागपूरच्या पोलिस अधिकाऱ्यांकडे मागणी

70

#Nagpur

• “ते”अवैध दारुचे व्यवसाय बंद करा – ज्वाला धोटेंची नागपूरच्या पोलिस अधिकाऱ्यांकडे मागणी

सुवर्ण भारत : किरण घाटे

नागपुर : नागपूरच्या नवीन वस्ती फुटाळा येथे दोन महिला अवैधरित्या दारुचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून करीत असून ते व्यवसाय तातडीने बंद करून संबंधित दारु विक्रेत्या महिलांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागपूर अन्याय निवारण समितीच्या ज्वाला जांबुवंतराव धोटे यांच्यासह त्या परिसरातील नागरिकांनी केली.आहे .या संदर्भात नुकतीच अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोडबोले यांची भेट घेत त्यांना एक लेखी निवेदन सादर केले.
संबंधित दारु विक्रेत्यांवर जलदगतीने कारवाई करु असे आश्वासन गोडबोले यांनी एका शिष्टमंडळाला या वेळी दिले.
विशेष उल्लेखनीय बाब अशी कि नवीन वस्ती फुटाळा येथील युवा नेते साहिल पाठे हे या दारु माफियां विरोधात सातत्याने लढा देत आहे