Home Breaking News #Ballarpur • भा.ज.पा. बल्लारपूर शहर पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उत्साहात पार •...

#Ballarpur • भा.ज.पा. बल्लारपूर शहर पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उत्साहात पार • नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

98

#Ballarpur
• भा.ज.पा. बल्लारपूर शहर पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक उत्साहात पार

• नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)

 

बल्लारपूर‌ : ‌आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर शहर तर्फे एक विशेष बैठक गोपाला पॅलेस मध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवा मोर्चाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा दृढ संकल्प केला.

बैठकीस प्रमुख मार्गदर्शनासाठी माजी खासदार अशोक नेते, वन विभाग महामंडळ चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, संघटन प्रभारी रामजी लाखिया, ज्येष्ठ नेते राजेंद्र गांधी, तसेच भा.ज.पा. शहराध्यक्ष अ‍ॅड. रणंजय सिंह उपस्थित होते.

निवडणुकीसाठी प्रभावी रणनीतीवर भर
बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी बूथ स्तरावरील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी संवाद वाढविणे, स्थानिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना सादर करणे आणि जनसंपर्क मोहिमेसाठी कृती आराखडा ठरविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

माजी खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भा.ज.पा. ही केवळ निवडणूक लढवणारी संघटना नसून समाजसेवेसाठी व विकासासाठी कटिबद्ध असलेली जनसंघटना आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेचा दीप जनतेपर्यंत नेणे हेच आपले प्रमुख कर्तव्य आहे.”

ज्येष्ट नेते चंदनसिंह चंदेल यांनी मतदारांपर्यंत विकासाचे संदेश पोहोचविण्यासाठी युवकांनी आघाडी घेण्याचे आवाहन केले.
संघटन प्रभारी रामजी लाखिया यांनी बूथ रचना आणि संघटन शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

शहराध्यक्ष अ‍ॅड. रणंजय सिंह यांनी म्हटले, “विकासाच्या राजकारणावर आधारित नगरपरिषद घडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज आहे. प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून पक्षाचा विजय निश्चित करावा.”

बैठकीचे संचालन भा.ज.पा. शहर सचिव किशोर मोहुर्ले यांनी तर आभारप्रदर्शन महामंत्री सतीश कनकम यांनी केले.

प्रमुख उपस्थिती या बैठकीत संघटन महामंत्री मनीष पांडेय, महामंत्री देवा वाटकर, माजी अध्यक्ष काशीनाथ सिंह, ज्येष्ठ नेते शिवचंद दिवेदी, निलेश खरबडे, समीर केने, राजु दरी, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. वैशाली जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष मिथलेश खेंगर, ज्येष्ठ नेत्या रेणुका दुधे आदींसह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागप्रमुख उपस्थित होते.

बैठकीदरम्यान सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून “संघटन हीच शक्ती आणि विकास हाच ध्येय” या घोषणांनी वातावरण भारावून गेले.