• चंद्रपूर मनपा समोर काॅंग्रेसचे ठिय्या आंदोलन
• पुलासाठी निधी मंजूर करा!
चंद्रपूर -किरण घाटे
चंद्रपूरच्या गांधी चौकातील महानगर पालिका समोर काल गुरुवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.सदरहु आंदोलन काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर व माजी नगरसेवक वसंत देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडले.
स्थानिक हनुमान खिडकी येथे काही दिवसांपूर्वी तुटून पडलेल्या पुलासाठी 4 कोंटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करा या प्रमुख मागणीसाठी कांग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते .
उपरोक्त आंदोलनाला चंद्रपूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला होता.
यावेळी काँग्रेसचे प्रवीण पडवेकर माजी नगरसेविका सुनीता लोढिया माजी नगरसेविका शालिनी भगत व अन्य काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष परब गिरडकर उपाध्यक्ष सोहम उजगांवकर ,सचिव सोम्या पत्रकार ,महासचिव लोचन कोडापे श्रीहरी दुर्गे, राजवीर बेस व अन्य विद्यार्थीगण उपस्थित होते.

