Home Breaking News ⬜माणंसात माणूस असावा⬜

⬜माणंसात माणूस असावा⬜

90

⬜माणंसात माणूस असावा

माणसात माणूस असावा
वाटते माझ्या मनाला
विसरून माणूसकी
माणूस चालला लयाला //१//

स्वार्था साठी माणूस
माणूसकी विसरला
जवळच्याच नात्यावर
पहा घाव त्याने घातला //२//

माणसात माणूस असावा
आई बाबांचे हे संस्कार
स्वार्थी जगात त्याला वाटे
असे हा जडलेला विकार //३//

पूर्वी माणसांत दिसायचा देव
आता मंदिरात हि देवाचा
माणूस मांडतो बाजार
विसरून गेला भाव भक्तीचा //४//

म्हणून म्हणतोय मी सदा
माणसात माणूस असावा
प्रेम, माया ममततेचा
सदा वर्षाव बरसावा //५//

🟫कु.मंगल शामराव मिसाळ
कवयित्री ठाणे