Home Breaking News ⬜◻️संगत असावी योग्य◻️⬜

⬜◻️संगत असावी योग्य◻️⬜

115

⬜◻️संगत असावी योग्य◻️⬜

जीवन एक आपलं संसाररुपी सागरात चालणारी नाव आहे परिवारात एकमेकांच्या संगतीने वल्हवित जाता मजबूत किनारा लाभतो!!
जसा देश, तशी राहणी, तसे विचार आपल्या जीवनाला अर्थ निर्माण करून देतो. आपल्या भावना,आपले विचार कुणाच्या वाईट संगतीत राहून बिघडवू नका.. संगतीचा परिणाम वाईट लवकर होतो चांगलं अनुकरण करायला वेळ लागतो. जो मुळातच चांगला असतो त्याला कुणाची जरुरत नसते. पण कधी कधी वाईट लोकांना हे हमखास खटकते आणि त्याला बिघाडवण्याचा प्रयत्न करतात. व्यसनाधीन करतात. आणि म्हणूनच संगत चांगली असावी…
संगत साधू संतांची असावी प्रत्येकाच्या जीवनात… त्यांचे विचार आचरणात आणावे.
आपल्याजवळ धन दौलत, पैसा सगळ्यांकडेच असतो, शेवटी उपयोगात येतात ती नाती.. नात्यांच्या संगतीत कोणतेही निर्णय घेतांना बोलणं आणि लढणं शिकल्या जाते. आपल्याशी नम्रतेने वागणारे पाहीजे त्याला कमजोर समजले तरी चालेल. कधी कधी उद्धटपणे वागणाऱ्यालाही हिम्मतवाला समजल्या जाते. काही गोष्टी सुरळीत होण्यासाठी व काही गोष्टी कळण्यासाठी संगतीत प्रत्येक गोष्टींचा तळ ही सापडतो.
चांगल्या संगतीचा दरवाजा चुकीचं गैरसमज सुधारून दरवाजा खोलून प्रगतीच्या वाटेवर चालता येतात.
तरीही प्रत्येकांच्या आयुष्यात विधाता वेगवेगळ्या रंगछटा भरतो. आपण आपले जीवन जगतांना कुणाच्या संगतीत जबाबदारीने जगतांना जबाबदारी ही कधीच वय लहान मोठे बघत नाही. आणि म्हणून अशा वेळेला कुणाचा सल्ला संगत ओझे झेलायला सक्षम असतो.
आपल्याला समजून घेणारी संगत योग्य असली की मनमोकळे पणाने आपण त्यावर विश्वास निर्माण करतो. आणि सर्वोच्च मोलाने त्यातून उभारणारे व्यक्तिमत्वचा आपण स्वीकार करतो.
वाईट संगत अंतर्मनातच अंधार निर्माण करतात त्यावेळी लाखो दिव्यांचा प्रकाश असला तरी व्यर्थच…म्हणूनच संगत योग्य असावी!!
🟥🔶🟧सौ. शैला चिमड्यालवार लेखिका सावली जिल्हा चंद्रपूर