#Ballarpur
• बल्लारपूर शिवसेना शहर संघटक प्रमुखपदी उमेश कुंडले यांची निवड
• नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनाला नवी उभारी
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बांधणीस नवे बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहर शिवसेना संघटक प्रमुखपदी उमेश कुंडले यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक शिवसेना संघटनाला नवचैतन्य प्राप्त होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर यांच्या उपस्थितीत कुंडले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बल्लारपूर विधानसभा निरीक्षक संदीप बरडे, दीपक बेले, जिल्हा संघटक जमील शेख, तालुका प्रमुख अविनाश उके, तसेच युवासेना महानगर प्रमुख पवन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना उमेश कुंडले म्हणाले, “शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आम्ही संघटन आणखी मजबूत करू. बल्लारपूर नगरपरिषद निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.”
कुंडले यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर शिवसेना संघटन अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील, असा विश्वास जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर यांनी व्यक्त केला.

