Home Breaking News • सहज सुचलंचे योगदान माझ्यासाठी मोलाचं – चित्रकार नूपुर मोडक

• सहज सुचलंचे योगदान माझ्यासाठी मोलाचं – चित्रकार नूपुर मोडक

230

• सहज सुचलंचे योगदान माझ्यासाठी मोलाचं – चित्रकार नूपुर मोडक

चंद्रपूर  : किरण घाटे

सहज सुचलं हा केवळ गृप नसून ते आचार विचारांचे एक मोठे व्यासपीठ आहे.
माझ्यासाठी आजपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंचे योगदान मोलाचे व अमुल्य ठरले आहे अशी बोलकी प्रतिक्रिया मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर दिलीप मोडक यांनी आज शनिवारला या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

उच्च शिक्षण घेण्यासाठी सध्या ती मुंबईत वास्तव्याला असून त्या चंद्रपूर शहरातील योग शिक्षिका रंज्जू मोडक यांच्या लाडक्या कन्या होत.

सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे व राजूराच्या सुपरिचित साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सावलीच्या नामवंत कवयित्री शैला चिमड्यालवार, जेष्ठ लेखिका विजया भांगे, समाजसेविका, रजनी रणदिवे, नलिनी आडपवार यांचे नेहमीच मला व माझ्या चित्रकलेला प्रोत्साहन मिळाल्याचे चित्रकार नूपुर मोडक यांनी सांगितले.

गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून सहज सुचलं अविरतपणे सुरू असून या महिला व्हाॅट्सअप गृपवर सर्व सदस्य गुणी व महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार प्राप्त असल्याचे त्या या वेळी बोलताना म्हणाल्या.

विशेषता कलाकुंजच्या मुख्य संयोजिका चंद्रपूरच्या आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचा त्यांनी आपल्या बोलण्यातून परत एकदा उल्लेख केला.तर नवोदित कवयित्री प्रियंका बेन्द्रे यांचा आदर्श नवोदितांनी डोळ्यांसमोर ठेवण्यासारखा आहे.

भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी यांचें कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.

सहज सुचलं वरील शेगांव खूर्द या ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देत असलेल्या अभियंता कु.प्रियंका गायकवाड यांचेही कार्य उत्तम आहे.
दोन तीन दिवसांत याच सहज सुचलं परिवार मध्ये जेष्ठ साहित्यिक प्रतिभा पवार,चंद्रपूरातील सुनंदा राठोड, समाजसेविका सारिका उराडे,राशी उराडे, व वणीच्या आर्टिस्ट पूनम वासाडे आदिं स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.