• एका प्रकरणात अहवाल देण्यासाठी मोठी लाच मागून एसीबीच्या जाळ्यात अडकलेला.
• महसूल विभागातील महालाचखोर नरेंद्र खांडेकर निलंबित !
चंद्रपूर : किरण घाटे
प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करून अहवाल पाठविण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेणारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील महालाचखोर सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यास नुकतेच निलंबित करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने काही दिवसांपूर्वी या लाचखोरास रविवारी सुट्टीच्या दिवशी लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.विशेष म्हणजे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या महाशयाने निव्वळ अहवाल पाठविण्यासाठी चक्क दोन लाख रुपयांची मागणी केली होती.त्यातील एक लाख रुपये या लाचखोराच्या सुरुवातीला खिश्यात गेले असल्याचे कळते. त्यांने ही रक्कम ही घटना घडण्याच्या काही दिवस अगोदर घेतली होती.त्यानंतर हाच लाचखोर तक्रारदारास अजून लाचेची मागणी करीत होता.दोन लाखांचा सौदा हा तडजोडी नंतर एक लाख तिस हजारांवर आला होता.एक लाख घेतल्यानंतरही हा लाचखोर अधिकारी सतत लाचेसाठी तक्रारदारांस तगादा लावत होता . शेवटी तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून या महालाचखोर महसूल सहायक अधिका-याची तक्रार दाखल केली.
एसीबीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास नुकतेच निलंबित केले.विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक लोकांच्या या लाचखोराबद्दल तोंडी तक्रारी होत्या.
सदरहू महालाचखोर हा शिपाई ते सहायक महसूल अधिका-या पर्यंत पोहचला होता.शेवटी त्याचे नशिब फूटले .
एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या या लाचखोरास सेवानिवृत्त होण्यास दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी शिल्लक होता.असे बोलल्या जाते .

