• शासकीय वाटप जमीनींच्या फेरफार प्रकरणात आता होणार चौकशी!
• दोषींवर कठोर कारवाई व्हावी-
बालाजी बावणेंची मागणी
• सावली तहसिलदारांचे हरंबा मंडळ अधिका-यांना पत्र
• माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कडेही जनतेंनी केली होती तक्रार सादर!
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल महसूल उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील साखरी या गावात काही भूमिहीन शेतकऱ्यांना शासकीय जमीनीचे वाटप करण्यात आले होते.परंतु काही मंडळींनी त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्या जमिनींची वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सर्रासपणे
विक्रीपत्र,बक्षीसपत्र,व संमतीपत्र केल्याची बाब उघडकीस आली आहे.
ह्यात त्या वेळचे दुय्यम निबंधक मंडळ अधिकारी व पटवारी दोषी असल्याचे समाजसेवक बालाजी बावणे यांचे म्हणणे आहे.
उपरोक्त प्रकरणात सखोल व निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी बावणे यांनी केली आहे.
या साठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष पूरवून चौकशी साठी जिल्हास्तरीय पथक नेमावे असे देखील बावणे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.
या व्यतिरिक्त असे अनेक प्रकरणे या तालुक्यात उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले होते.
विशेष म्हणजे त्यांनी जे काही फेरफार प्रकरणे तक्रार अर्जात दर्शविले आहे .
त्यांचे फेरफार होवून सातबाराच्या नावात दुरुस्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
एव्हढे वर्ष होवूनही हे सर्व प्रकरणे तलाठी दप्तर तपासणीत उजेडात का आले नाही हे एक कोडेच आहे.
संबंधित तलाठी दप्तरची सखोल तपासणी केल्यानंतर अजून काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बावणे यांचे म्हणणे आहे.
आता होणार या प्रकरणाची चौकशी !
————————————————– सावली तालुक्याच्या काही गावांतील अश्या प्रकरणा संबंधात सावलीचे बालाजी बावणे ,मूलचे समाजसेवक दत्तात्रय समर्थ व पडोलीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे यांनी या प्रकरणात सातत्याने आपल्या संघटने मार्फत पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
दरम्यान बावणे यांनी माजीमंत्री व प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यादरम्यान त्यांना एक लेखी तक्रार करत या संपूर्ण प्रकरणाची माहिती समजून दिली होती.
सावलीच्या तहसिलदार प्रांजली चिरडे यांनी हरंबाचे मंडळ अधिकारी यांना नुकतेच एक लेखी पत्र देवून चौकशी अहवाल मागितला आहे.

