Home Breaking News #Ballarpur • काँग्रेसच्या पारदर्शक मुलाखतींनी कार्यकर्त्यांत नवचैतन्य

#Ballarpur • काँग्रेसच्या पारदर्शक मुलाखतींनी कार्यकर्त्यांत नवचैतन्य

96

#Ballarpur
• काँग्रेसच्या पारदर्शक मुलाखतींनी कार्यकर्त्यांत नवचैतन्य

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरात काँग्रेस पक्षाकडून नगरपरिषद सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी (दि. ०९ नोव्हेंबर २०२५) दुपारी ३:३० वाजता डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड येथील एकदंत लॉन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

या मुलाखत कार्यक्रमाला बल्लारपूर विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत, वरिष्ठ नेते जैनुद्दीन जव्हेरी, प्रदेश सचिव घनश्याम मूलचंदानी, डॉ. रजनीताई हजारे तसेच शहराध्यक्ष देवेंद्र आर्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

बल्लारपूर नगरपरिषदेच्या एकूण १७ प्रभागांमधील ३४ जागांसाठी तब्बल ६७ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. उमेदवारांसोबत त्यांच्या समर्थकांची शेकडोच्या संख्येने उपस्थिती होती, ज्यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा उत्साह जाणवत होता.

मुलाखत प्रक्रिया शिस्तबद्ध आणि पारदर्शक रितीने पार पडली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी अध्यक्ष अब्दुल करीम, भास्कर माकोडे, प्राणेश अमराज, महमूद पठाण, अस्लम शेख, कैलाश धानोरकर, शुभम दिवसे, गौरव परसूटकर, फारुख शेख, सादिक शेख आणि सुरेश बोप्पनवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

काँग्रेस पक्षाच्या या उपक्रमामुळे नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.