Home Breaking News #Ballarpur • शेवटच्या घटकाचा विचार – हाच खरा न्याय : न्यायमूर्ती अनिल...

#Ballarpur • शेवटच्या घटकाचा विचार – हाच खरा न्याय : न्यायमूर्ती अनिल किलोर • दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

54

#Ballarpur
• शेवटच्या घटकाचा विचार – हाच खरा न्याय : न्यायमूर्ती अनिल किलोर

• दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : “संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत. सुसज्ज इमारत उभी राहील, पण न्याय देताना सामान्य माणसाचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे,” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले. ते बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाला न्यायमूर्ती अनिल पानसरे, न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धि भिष्म, अ‍ॅड. ईनायत सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यायमूर्ती किलोर म्हणाले, “पैसा नाही म्हणून गरिबाची केस नाकारू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या घटकाला न्याय मिळणे गरजेचे आहे.” त्यांनी ‘तारीख पे तारीख’ संस्कृतीवर टीका करत जलद न्याय मिळण्यासाठी गुणवत्तापूर्ण कामकाजाची गरज व्यक्त केली.

न्यायमूर्ती पानसरे यांचे मार्गदर्शन नवीन इमारतीचे बांधकाम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत आणि गुणवत्तापूर्वक काम करावे, असे आवाहन न्यायमूर्ती पानसरे यांनी केले.
न्यायमूर्ती नेर्लीकर यांचे मत ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार उभी राहणारी ही इमारत जलद न्यायप्रक्रियेला चालना देईल, असे न्यायमूर्ती नेर्लीकर यांनी सांगितले.

नवीन इमारतीची वैशिष्ट्ये 36 कोटी 73 लाख खर्चाची ही इमारत तळमजला + 3 मजले अशी असून कोर्ट हॉल, न्यायाधीश कक्ष, ग्रंथालय, मध्यस्थी कक्ष, व्ही.सी. रूम आदी अत्याधुनिक सुविधा असतील.
बल्लारपूरमध्ये उभी राहणारी ही नवी न्यायालयीन वास्तू नागरिकांसाठी सक्षम आणि सुकर न्यायप्रक्रियेचे नवे दालन ठरणार आहे.