Home Breaking News #Ballarpur #आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ३६ कोटी ७० लाख रुपयांची न्यायालय...

#Ballarpur #आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ३६ कोटी ७० लाख रुपयांची न्यायालय इमारत मंजूर #बल्लारपूर बार असोसिएशनने मानले आमदार मुनगंटीवार यांचे आभार

180

#Ballarpur
#आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ३६ कोटी ७० लाख रुपयांची न्यायालय इमारत मंजूर

#बल्लारपूर बार असोसिएशनने मानले आमदार मुनगंटीवार यांचे आभार

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज अखेर साकार होणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे ३६ कोटी ७० लाख रुपयांच्या मुख्य न्यायालयीन इमारतीचे बांधकाम मंजूर झाले आहे. या इमारतीच्या माध्यमातून बल्लारपूर तालुक्याच्या न्यायव्यवस्थेला एक नवा दृषटिकोन मिळणार आहे. इमारतीच्या उभारणीला मंजुरी मिळाल्याने, क्षेत्रातील कामकाजाला नवा गती मिळणार असून, नागरिकांची गैरसोय दूर होईल.   आधुनिक सुविधा आणि सुरक्षित परिसर
यावेळी, न्यायालय इमारतीसोबतच वकिलांसाठी अत्याधुनिक सभागृहासाठी १ कोटी ७२ लाख रुपये आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी ४ कोटी ७८ लाख रुपयांची मंजुरी देखील मिळाली आहे. वर्षांपासून असलेल्या सुविधांच्या अभावामुळे सुरु असलेल्या कामकाजाला सुगम आणि कार्यक्षम बनवण्यासाठी ही इमारत महत्वाची ठरणार आहे.

आ. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडे त्यांचे आश्वासन पूर्ण करण्यासंबंधी ठामपणे निर्णय घेतला गेला. याप्रकल्पाच्या प्रगतीमध्ये त्यांनी दाखवलेली प्रामाणिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बल्लारपूर तालुका बार असोसिएशनने त्यांचे आभार मानले आहेत.

“विधी क्षेत्र कायम आपले कृतज्ञ राहील,” असे म्हणत बल्लारपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सय्यद सर, उपाध्यक्ष ॲड. किशोर पुसलवार, सचिव ॲड. संजय बोराडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.  बल्लारपूर तालुक्याच्या न्यायव्यवस्थेतील नव्या अध्यायाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी विश्वास व्यक्त केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून न्याय व पारदर्शकतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.