#Chandrapur
• सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचा चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याची कार्यशाळा आणि पद नियुक्ती कार्यक्रम पार पडला
सुवर्ण भारत : कृष्णा चव्हाण

चंद्रपूर : महाराष्ट्रातील मोडकळीस आलेल्या सेवाभावी संस्थांना सुगीचे दिवस यावेत याकरिता सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचा राज्यअध्यक्षा डॉ. सुनिताताई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी दौरा चालू आहे….या दौऱ्यामध्ये.. बुधवार,दिनांक 19 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याची कार्यशाळा आणि पदनियुक्ती कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समितीच्या राज्य अध्यक्षा डॉ. सौ. सुनिताताई मोडक यांनी भूषविले. तसेच हजर असणाऱ्या शेकडो सामाजिक संस्थांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीचा भाग देवून उपकृत केले. प्रमुख अतिथी वानखेडे साहेब धर्मदाय आयुक्त, प्रभाताई येरकुरे पोलीस निरीक्षक, मारोतराव माटे ज्येष्ठ नागरिक संघ आणि तसेच
सदर कार्यशाळेचे नियोजन नागपूर विभाग सचिव पवन माटे,प्रकोष्ठ राज्य सदस्य तुषार रेड्डीवार, संपर्कप्रमुख माया खरंगकर, अश्विन राऊत, जिल्हाउपाध्यक्ष वैशाली बेलेकर, विलास मते यांनी केले.
यावेळी राज्यध्यक्षा यांच्यासोबत, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, नागपूर विभाग पदाधिकारी,चंद्रपूर गडचिरोली जिल्हा आणि तालुका पदाधिकारी आणि शेकडो संस्थांचे संस्थापक, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

