#Gadchiroli
• अतिक्रमणधारकांना कायदेशीर जमिनीचे पट्टे द्यावेत!
• माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
मुलचेरा : ग्रामपंचायत शांतिग्राम येथील महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत मागणी पत्र देण्यासाठी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तारमारे यांनी तहसीलदारांची भेट घेत निवेदन सादर केले.
निवेदनात शांतिग्राम येथील ४२ महसूल जमीन अतिक्रमणधारकांना त्यांच्या ताब्यातील जमिनींचे कायमस्वरूपी पट्टे मंजूर करावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली. पट्टे मंजूर झाल्यास लाभार्थ्यांना कायदेशीर संरक्षण मिळून त्यांच्या शेती व निवासस्थानास स्थैर्य प्राप्त होईल, असे या वेळी सांगण्यात आले.
या प्रकरणावर तहसील कार्यालयात सविस्तर चर्चा झाली. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारत संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन सादरीकरणाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, जिल्हा सचिव बादल शाह, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश गारघाटे, उपसरपंच तपन मल्लिक, वैष्णव ठाकूर तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

