• व्यथा वृध्द कलावंतांची!
• वृध्द कलावंतांना मानधनाचा लाभ मिळावा सारिका उराडेंची रास्त मागणी!
चंद्रपूर : किरण घाटे
किमान पाचशे कलावंतांना मानधन मंजूर करण्यात यावे , कलावंताची जीवनशैली लक्षात घेता मानधन करीता त्यांची वयोमर्यादा किमान 40वर्ष करण्यात यावी , अपंग, विधवा, कलावंतांना वयाची अट नसावी व सन 1954-55 पासून सुरू असलेल्या यादीत बदल करून वृद्ध कलावंतांना मानधनाचा लाभ शासनाकडून देण्यात यावा अश्या मागण्यांचे एक लेखी निवेदन नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याचे
विनय गौडा यांना आपली व्यथा ऐकिवत अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या संस्थापक -अध्यक्ष सारिका उराडे यांनी सादर केले.
या वेळी प्रामुख्याने आरपीआयचे आठवले गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, गौतम भसारकर, चंद्रशेखर राऊत, यशवंत उराडे, नाट्य कलावंत राशी उराडे, कुंदा बोरकर, काशिनाथ भोयर, निर्मला लांजेवार, भैय्यालाल रामटेके, सुरेखा पोपडे, निर्मला अवगाना,लता लोडे, राजेंद्र पाटील,पार्वता ठिकरे, संगिता जांभूळकर,मंदा करकाडे,नथ्थुजी ठाकरे,गयना रामटेके, मंगला करकाडे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों वृध्द कलावंत उपस्थित होते.

