#Ballarpur
•अधिकृत उमेदवारांविरोधात कृती करणाऱ्यांवर कारवाई अपरिहार्य: देवेंद्र आर्य”
सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनीधी)
बल्लारपूर: नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदासह सर्व ३२ वार्डांसाठी अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी स्पष्ट इशारा दिला की, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध काम करणाऱ्या कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
देवेंद्र आर्य यांनी विश्वास व्यक्त केला की या निवडणुकीत काँग्रेस पक्ष भक्कम बहुमत मिळवेल. “काँग्रेसचे अध्यक्षपद आणि २० पेक्षा अधिक नगरसेवक निश्चितपणे निवडून येतील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरपरिषद निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल आणि इंटक यांसह शहर काँग्रेस कमेटीच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना निश्चितच यश मिळेल आणि बल्लारपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकेल, असा विश्वास आर्य यांनी व्यक्त केला.

