Home Breaking News चिमुकलीवर बलात्कार करून निघृण हत्या केल्या प्रकरणातील “त्या “हरामखोरास फाशीची शिक्षा द्या-मनसेच्या...

चिमुकलीवर बलात्कार करून निघृण हत्या केल्या प्रकरणातील “त्या “हरामखोरास फाशीची शिक्षा द्या-मनसेच्या तालुकाध्यक्षा कल्पना पोर्तलावारांची मागणी

78

चिमुकलीवर बलात्कार करून निघृण हत्या केल्या प्रकरणातील “त्या “हरामखोरास फाशीची शिक्षा द्या-मनसेच्या तालुकाध्यक्षा कल्पना पोर्तलावारांची मागणी

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

चंद्रपूर: राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढले असून महिलांना घराबाहेर पडणे देखील धोक्याचे झाले आहे.
डोंगराळ येथील चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून व तिच्या तोंडावर दगड टाकून निघृण हत्या करण्यात आली या गुन्हेगारा विरुद्ध कठोर कारवाई करून त्यास फासावर चढवावे ज्यामुळे अशा घटना पून्हा घडणार नाहीत व राक्षसीवृत्ती सारखी हिम्मत देखील कोणी करणार नाही .या प्रकरणात लवकरात लवकर ठोस पाऊले उचलावी अन्यथा मनसे महिला सेना आक्रमक आंदोलन करेल या आशयाचे एक लेखी निवेदन मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी, मनसेचे चंद्रपूर जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात मनसे महिलासेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पना पोर्तलावार व जिल्हा उपाध्यक्ष यांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले असून निवेदन देताना शिष्टमंडळात अश्विनी खोके, शुभांगी काकडे, आशा गोधडी, इंद्र काढताडे, सुकेशीनी निमकर तथा मनसेचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.