काय लिहू तुझ्यावर
काय लिहू तुझ्यावर
शब्द माझे थरथरतात
बासरीच्या सुरात तुझ्या
माझे भाव विरघळतात.
तुझ्या फक्त नजरेने
मोहक रंग फुलतात
संपूर्ण सृष्टीत जणू
प्रीतरंग भरतात.
तुझ्या बासरीच्या स्वरात
मन झरझर गाते
प्रेमाचे गुपित माझ्या
साऱ्या श्वासात दाटते.
तुझ्याविना श्रीहरी मी
माझी ओळख हरवते
पण तू मात्र नेहमीच
माझं अस्तित्व जपते.
तूझ्या भक्तीरसात कान्हा
मी स्वतःला वाहिले
माझ्या प्रत्येक श्वासात
तुझेच नाव कोंदीले.
🟥प्रा.वैशाली राऊत
सहज सुचलं कवयित्री नागपूर

