Home Breaking News #Pombhuna • पोंभुर्णा तालुका आदिवासी न्यायासाठी सकारात्मक पाऊल • श्री. जगन...

#Pombhuna • पोंभुर्णा तालुका आदिवासी न्यायासाठी सकारात्मक पाऊल • श्री. जगन एल.के. महाराज यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर यशस्वीरीत्या मार्गी लागले.

109

#Pombhuna
• पोंभुर्णा तालुका आदिवासी न्यायासाठी सकारात्मक पाऊल

• श्री. जगन एल.के. महाराज यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर यशस्वीरीत्या मार्गी लागले.

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

पोंभुर्णा : तालुक्यातील केमारा, भटाडी व देवई या आदिवासी गावांतील स्थायी निवासी पट्ट्यांच्या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी मागील २४ दिवसांपासून सुरू असलेले श्री. जगन एल.के. महाराज यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर यशस्वीरीत्या मार्गी लागले.
महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने संबंधित विभागांशी समन्वय साधत अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आले. उर्वरित मागण्या एका महिन्यात निकाली काढण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर श्री. जगन महाराज यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
आमदर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष हरिश शर्मा उपस्थित राहून श्री. जगन महाराज यांना नींबू पाणी पाजून अन्नत्याग उपोषणाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
यावेळी डीवायएसपी ईश्वर कातकडे, तहसीलदार सेलवटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी आमले, भाजप तालुकाध्यक्ष हरी पाटील ढवस, पिंटूभाऊ मंगलगिरीवार, राहुलभाऊ संतोषवार, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, संतोष कुमरे, वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकार, राऊंड ऑफिसर श्यामजी यादव, ईश्वर नेताम, मोहन चलाक, ठाणेदार वाघमारे, गणेश परचाके, गुरु भाऊ पिपरे, बंडू बुरांडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या निर्णयामुळे आदिवासी बांधवांच्या हक्कांना न्याय मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.