• नवोदितांना प्रोत्साहन देणारा सहज सुचलं गृप -विजया भांगे
चंद्रपूर -किरण घाटे(विदर्भ विशेष प्रतिनिधी)
नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिक ॲड.मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप खरोखरंच नवोदितांना प्रोत्साहन देणारा ठरलेला आहे.असे मत विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील पथ्रोटच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे यांनी काल एका भेटी दरम्यान बोलताना व्यक्त केले.
भांगे ह्या सेवानिवृत्त शिक्षिका असून त्यांनी आज पर्यंत अनेक विषयांवर विपुल लेखन केले आहे.
दै.पुण्य नगरीचा दीपावली अंकातील लेखासाठी या पुर्वी त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
विदर्भातील अनेक व्हाॅट्सअप गृपवर त्या आजही नियमित स्तंभ लेखन करीत आहेत.
मायाताई कोसरे व मेघा धोटे यांच्याशी त्यांचे अतिशय निकटचे संबंध राहिले आहे.
सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांच्या कार्याची त्यांनी तोंडभरून स्तुती केली.
दिवसेंगणिक सहज सुचलं वरील सदस्यांची संख्या वाढत आहे ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब असल्याच्या त्या शेवटी म्हणाल्या.

