Home Breaking News माझी मीच

माझी मीच

185

माझी मीच

त्रास माणसाचा नसतो
तो असतो माणसाच्या मानातल्या अपेक्षेचा
आपण दिलेल्या प्रेमाची
परतफेड मिळेल
या आशेचा
यांनी मला वेळ द्यायला हवी
यांनी मला साथ द्यायला हवी
त्यांनी मला समजावून घ्यावे
हे सर्व मनात येणे
म्हणजे अपेक्षा
पण सत्य जाणल तर —-
प्रत्येक जण सत्य जानत नाही
किंबहुना जाण्याचा प्रयत्न करीत नाही
सध्या भावना लोप पावल्या ,आहे
व्यवहाराने जागा घेतली आहे
कुणाचे असणे,नसणे
काही फरक पडत नाही
म्हणून अपेक्षा सोडल्या की,
गोंधळ मिटतो
भावना क्षमतात
आणि मनाचा ताण जातो
खरा ताण कमी करायचा असेल
तर माझ्यासाठी मीच पुरेशी आहे
हिच भावना
हाच खरा आनंद
✍️सुप्रिया राजेंद्र सादलवार
⬜शिक्षिका चंद्रपूर ⬜