Home Breaking News अनाथांची माय -सिंधुताई सपकाळ

अनाथांची माय -सिंधुताई सपकाळ

70

अनाथांची माय -सिंधुताई सपकाळ

पुरातन काळापासून तर आधुनिक युगापर्यंत स्त्रीचे जीवन हे अनेक संघर्षानी भरलेले आहे.
स्त्रीला निसर्गाचे अद्भुत वरदान आहे. स्त्रीची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर म्हणजे एक सदैव अंतर्मनात तेवत असणारी ज्योत आहे…. त्याच संघर्षातल्या सिंधूताई सपकाळ….सामाजिक कार्यकर्त्या!!
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म एका गरीबाघरी झाला. जन्मताच वडिल तिचा तिरस्कार करत होते. तिला एकदाही बघितलं नाही. राग राग करायचे.. आई ची प्रेमळ माया मिळत होती त्यावरच त्या जगत होत्या. वडिलांचं प्रेम मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केलं,परंतु व्यर्थ… वडिलांच्या प्रेमाला कायम वंचित राहिल्या त्या बालवयात असतांना पासूनच शाळेत जायची त्यांना मुभा नव्हती.

रोज शेण गोळा करायला शाळे जवळून जात असतांना शाळेत मास्तर शिकवितांना अगदी शाळेच्या बाहेर उभं राहून खिडकीतून शिकवणं बघून समजून घेत होत्या आणि मास्तरनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या बाहेरूच देत होत्या..मास्तरांनी त्यांच्या घरी जावून सांगितले की या हुशार मुलीला शाळेत शिकायला येऊ द्या परंतु वडिलांनी त्यांची आज्ञा धूडकावून लावली… दिवसांगणित मोठ्या होत असतांना गावातील लोकं सुद्धा त्रास देत होते.त्यानंतर श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झालं तिथेही त्यांना अतोनात त्रास होता .अशातच त्या सासरी सुद्धा रोजी रोटी कमवायच्या.. रोजगार स्त्रियांना न्याय मिळवून द्यायच्या.. त्यामुळे रागानी गावातील जमीनदारानी त्यांना त्रास द्यायला सुरवात केली .तो त्रास त्यांनी खूप सहन केला. सासरी नवऱ्याशिवाय कुणीच चांगले बघत नव्हते…काही दिवसांनी नवऱ्यासकट सर्वांनी गरोदरपणात त्यांना घराबाहेर काढले.. गोठ्यात राहात असतांना त्यांना मुलगी झाली छोट्या मुलीला घेवून त्या गाईच्या गोठ्यात राहू लागल्या.. काही दिवसांनी सासर सोडून छोट्या मुलीला घेवून कुठे काय मिळेल? या शोधात असतांना थोडं पीठ मिळालं की स्मशानातील विस्तवावर भाकर भाजून पोट भरत होत्या.. आणि म्हणूनच सिंधुताई धगधगणारी आग बालपनापासूनच होत्या.. तप्त राख न होता आपले अस्तित्व हिमतीने सांभाळल्या.. अश्रू कितीही दाटले तरी मनातील निखऱ्याला विझवून नवा जन्म घेतला!!त्या महान सिंधुताई…
साहसाने उभ्या होताच मग उपहासांचे क्षमले वारे, आणि कुणाकडे लक्ष न देता पडले त्यांच्या पदरी चंद्र- तारे.. सिंधुताई श्रीकृष्णाची आराधना करीत असत.. त्यातूनच अनेक बालकांना दत्तक घेऊन सुखद स्पर्शाची जाणीव करून दिली त्यांची सर्वांची आई बनली…”अनाथांची माय ”
सिंधुताईनी विपरीत परिस्थितीवर मात करता येते हे दाखवून दिले त्यांनी त्यांच्या स्वबळावर!!त्यांच्या अहोरात्र कष्टाचे फळ पद्मश्री पुरस्कारासाठी पात्र ठरल्या…..

🟨सौ. शैला चिमड्यालवार सावली