स्वभाव घडवतो भविष्य
व्यक्तीचे भविष्य घडवण्यात त्याचा स्वभाव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. बुद्धिमत्ता, शिक्षण किंवा संपत्तीपेक्षा स्वभाव हा व्यक्तीचा खरा परिचय असतो. आपण कसे वागतो, कसा विचार करतो आणि परिस्थितीला कसे सामोरे जातो— यावरच आपल्या आयुष्याची दिशा ठरते.
संयम, प्रामाणिकपणा, सकारात्मक विचार, परिश्रमाची तयारी आणि सहकार्याची भावना हे चांगल्या स्वभावाचे गुण आहेत. अशा स्वभावाची माणसे सहज सर्वांना आपलेसे करतात. उलट, राग, आळस, अहंकार आणि नकारात्मकता हे दोष भविष्यात अडथळे निर्माण करतात व माणसाला माणसापासून दूर लोटतात.
स्वभाव एका दिवसात घडत नाही; तो रोजच्या सवयींमधून, अनुभवांतून आणि निर्णयांतून घडत जातो. चांगला स्वभाव म्हणजे आयुष्यभराची शिदोरी आणि भरभराट. मनमिळावू स्वभावाच्या व्यक्ती नातेसंबंध व मित्रपरिवाराच्या बाबतीत खरोखरच श्रीमंत असतात. त्यामुळे त्यांचे भविष्य आपोआप उज्ज्वल होत जाते.
*खरं तर, स्वभावच आपले भविष्य घडवतो.*
⬜✍️⬜प्रा. वैशाली राऊत सहज सुचलं लेखिका -कवयित्री नागपूर





