
सेल-सीएफपीच्या प्रयत्नाने कर्णबधीर दिव्यांगांना ऐकू येणार आता आवाज
चंद्रपूर -किरण घाटे
कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून आणि आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या युनिट चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट (CFP) द्वारे चंद्रपूर येथील पत्रकार भवन येथे 50 संच (100 संख्या) च्या विशेष सहाय्यक श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात आले.
उमेश एम. उके, डीजीएम (एचआर) यांनी स्वागत केले आणि भूतकाळात चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटने हाती घेतलेल्या विविध सीएसआर उपक्रमांबद्दल थोडक्यात माहिती दिली. सीएफपीचे dk;Zikyd संचालक पी. मुरुगेसन हे प्रमुख पाहुणे होते आणि डी.व्ही. रवी चंदर, सीजीएम (Maintenance) आणि सीजीएम (Marketing & Commercial) चे अतिरिक्त प्रभारी, आर.डी. गायकवाड, सीजीएम (वर्क्स), आणि
प्रवीण कुमार एल, जीएम (एचआर) हे सन्माननीय पाहुणे होते.
चंद्रपूर दिव्यांग कौशल्य विकास संस्थेच्या सहकार्याने कृत्रिम अवयव उत्पादन कंपनी (अॅल्मिको) यांनी वितरणाचे समन्वय साधला. याप्रसंगी बोलताना संचालक पी. मुरुगेसन यांनी सांगितले की, विशेष दिव्यांगांना सक्षम, आत्मविश्वासू आणि दृढनिश्चयी बनवणे आणि समाजात अर्थपूर्ण बदल घडवून आणणे हा सीएफपीने हाती घेतलेल्या सर्व सीएसआर उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत करणे हा आहे.
कनिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) शकील अहमद खान यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम SAIL-CFP च्या मानव संसाधन गटाने आयोजित केला होता.




