Home Breaking News बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व अल्का वाढई नगराध्यक्षपदी;...

बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व अल्का वाढई नगराध्यक्षपदी; १७ जागांवर काँग्रेसचा दणदणीत विजय

515
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

• बल्लारपूर नगर परिषद निवडणूक : काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

• अल्का वाढई नगराध्यक्षपदी; १७ जागांवर काँग्रेसचा दणदणीत विजय

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत शहराच्या राजकारणावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासह एकूण १७ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने सत्ता आपल्याकडे खेचली आहे.

नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसच्या अल्का अनिल वाढई यांनी भाजपच्या रेणुका दुधे यांचा २१५ मतांनी पराभव करत विजय मिळवला. अल्का वाढई यांना १४,६०७ मते, तर रेणुका दुधे यांना १४,३९२ मते मिळाली. शिवसेना (शिंदे गट) च्या चैताली मुलचंदानी यांना १०,६०२ मते मिळाली.

नगरसेवक निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर
नगरसेवक पदांच्या निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपला ७, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला ३, शिवसेना (शिंदे गट) ला १, तर १ जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.

प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे—
प्रभाग १: लखनसिंह चंदेल (भाजपा), छाया मडावी (काँग्रेस)

प्रभाग २: मोहित डांगोरे (भाजपा), वैष्णवी जुमडे (काँग्रेस)

प्रभाग ३: पवन मेश्राम, शिल्पा चुटे (दोन्ही काँग्रेस)

प्रभाग ४: महेंद्र ढोके (भाजपा), अमकुबाई भिक्या (काँग्रेस)

प्रभाग ५: सिक्की यादव, रंजिता बिरे (दोन्ही शिवसेना)

प्रभाग ६: देवेंद्र आर्य, मोना धानोरकर (दोन्ही काँग्रेस)

प्रभाग ७: अब्दुल करीम, वैशाली हुमने (दोन्ही काँग्रेस)

प्रभाग ८: मुकद्दर शेख (काँग्रेस), प्रियंका थुलकर

प्रभाग ९: मनोज बेले (शिवसेना), मेघा भाले (काँग्रेस)

प्रभाग १०: सुमित डोहने, साजीया शेख (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग ११: इस्माईल ढाकवाला, शारदा माकोडे (दोन्ही काँग्रेस)

प्रभाग १२: सुनीता जिवतोडे (काँग्रेस), निरज झाडे (भाजपा)

प्रभाग १३: किरणसिंह चंदेल, शालू कुमरे (दोन्ही भाजपा)

प्रभाग १४: काजल तोटावार (उबाठा), रवि मातंगी (काँग्रेस)

प्रभाग १५: प्रणित सातपुते (राष्ट्रवादी काँग्रेस), रजनी मुलचंदानी (शिवसेना उबाठा)

प्रभाग १६: अविनाश मट्ठा (शिवसेना शिंदे गट), रेब्बावर (काँग्रेस)

प्रभाग १७: विद्या खरतड (भाजपा), सलीम नबी अहमद (अपक्ष)

चुरशीच्या लढती
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमित डोहने यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला, तर काँग्रेसच्या छाया मडावी यांनी अवघ्या तीन मतांच्या फरकाने विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणा देत विजयाचा आनंद साजरा केला. काँग्रेसच्या या विजयामुळे बल्लारपूरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.