Home Breaking News • विनयाआईंच्या आरती संग्रहातून धर्मानिरपेक्षतेचे संस्कार – डॉ. धनंजय साळवे

• विनयाआईंच्या आरती संग्रहातून धर्मानिरपेक्षतेचे संस्कार – डॉ. धनंजय साळवे

122

विनयाआईंच्या आरती संग्रहातून धर्मानिरपेक्षतेचे संस्कार – डॉ. धनंजय साळवे

चंद्रपूर : ⬜ किरण घाटे ⬜

स्मृतीशेष विनयाआईंच्या आरती संग्रहातून धर्म निरपेक्षतेचे संस्कार होतात व मानवी मनाची मशागत करत… उत्तम जीवन जगण्याचे संस्कार होतात. याच संस्कारातून त्यांचे पुत्र रमेशचंद्र दहिवडे जेष्ठ कामगार नेते म्हणून घडले. हे आरती संग्रह वाचून आपणही घडू शकतो. असे मत कवी, लेखक व समाज कल्याण अधिकारी डॉ. धनंजय साळवे यांनी व्यक्त केले.
ते दि.19. डिसेंबर 2025 रोजी संत नगाजी महाराज सभागृह येथे आयोजित विनयाताई दहिवडे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांनी स्वतः लिहिलेल्या आरती संग्रहाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते पुस्तक प्रकाशक व प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या प्रसंगी डॉ. प्रा. एल. व्ही. शेंडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कामगार नेते कॉ. रमेशचंद्र दहिवडे, डॉ. कुंदा पाचुंदे, कॉ. मनोहर मुळे, नागपूर साहित्यिक राजेश डोलकी, कॉ. राजेश पिंजरकर व श्यामचंद्रा दहिवडे उपंस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटन समूतिशेष विनयाताई दहिवडे यांच्या प्रतिमेला मलार्पण व दीप प्रज्वलीत करून करण्यात आले.
सखी भजन मंडळच्या क्रांतीताई दहिवडे, सुषमा राऊत, रंजना मंगुळकर, संध्या शेंडे, संध्या करसेलवार यांनी पुस्तकातील भजन सदर केले.
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. शेंडे म्हणाले, ‘विनयाताई विठ्ठलाचे भक्त आहेत… पण ते आपल्या आर्त्यांमधून विठ्ठलाला काय मागत आहेत…? इतरांना चांगली बुद्धी दे… भेदभाव संपू दे… सर्वांच्या मनात सतत चांगुलपणा व परोपकार वसू दे… अश्या प्रकारे जनकल्यानाची तळमळ… कळकळ त्यांच्या प्रत्येक काव्यातून व्यक होत आहे… या आर्त्यांमध्ये मानवी मूल्य रुजवण्याचे आईचे संस्कार आहेत… आपण हे आरती संग्रह वाचून ते संस्कार करून घेऊन समृद्ध व्हावे.’ असे आवाहनही त्यांनी रसिकांना केले. कार्यक्रमाची प्रस्तावना रमेशचंद्र दहिवडे यांनी केली
आरतीसंग्रह पुस्तक प्रकाशन बाबतचे महत्व श्यामचंद्रा दहिवडे यांनी सांगितले. तर अरुण भेलके यांनी सुरेखरित्या सूत्र संचालन करत.. म्हटले. मधुबन खुशबू देता है…, मै ना हिंदू ना मुसलमान… आदमी हू आदमी से प्यार करता हू… ( ही गाणी ऐकवली).उपस्थितीतांचे आभार डॉ. कुंदा पाचुंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शरद गायकवाड, शिला खोब्रागडे, अजय गेडाम, अनिल येणकर, हिमांशू व सिध्दू आदिंनी परिश्रम घेतले.