Home Breaking News आठवण

आठवण

208
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आठवण

अलगद तिला तळ हातावर घेतले नी
ती उडून गेली.
तळहातावर तिच्या रंगांची छटा
सोडून गेली
रंगीबेरंगी तिला उडताना
पाहात होते .
तिच्या जगात रमत होते
बालपणाचे ते खेळ आठवताना
चेहऱ्यावर एक स्मित हास्य येते
बालपणीच त्यांची संख्या
जी दिसत होती , ती लोप पावली
पण कधीतरी माझ्या अंगणात
एखाद दुसरी आली तर
मी आजही त्या विश्वात रमते
त्या फुलपाखरांना उडताना पाहाते
नी पाहात राहते
नी पाहात राहते.
🔲✍️ सुप्रिया सादलवार/गुंडेवार
कवयित्री चंद्रपूर