Home Breaking News कृतज्ञता – आनंदाची खरी गुरुकिल्ली

कृतज्ञता – आनंदाची खरी गुरुकिल्ली

164
Oplus_16908288

कृतज्ञता – आनंदाची खरी गुरुकिल्ली

*कृतज्ञता* म्हणजे आपल्या जीवनात मिळालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवून त्याबद्दल मनापासून आभार मानण्याची भावना. आज आपण सतत अधिक मिळवण्याच्या मागे धावतो; पण या प्रवासात जे आधीच मिळाले आहे, त्याचे मोल अनेकदा विसरतो. अशा वेळी कृतज्ञतेची भावना जीवनाला खरे समाधान देते.
कृतज्ञता म्हणजे फक्त “धन्यवाद” म्हणणे नव्हे, तर प्रत्येक अनुभवातून मिळालेल्या शिकवणीचा स्वीकार करणे आणि आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक चांगल्या व्यक्तीचे मनापासून आभार मानणेही होय. कुटुंब, मित्र, गुरु आणि सहकारी यांच्या योगदानामुळेच आपला जीवनप्रवास अधिक समृद्ध होत असतो.
कृतज्ञ मनात नकारात्मकता टिकत नाही. जे मिळत आहे त्यात समाधान मानून प्रयत्न सुरू ठेवले, तर तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो. म्हणूनच कृतज्ञता ही आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे.
*जिथे कृतज्ञता असते, तिथे आनंद आपोआप नांदतो.*

🔲✍️🔲प्रा.वैशाली राऊत सहज सुचलं लेखिका नागपूर