
#Mul
• नलिनी आडपवार यांनी मानले मतदारांचे आभार!
चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी
मुल नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक पदासाठी विजयी झालेल्या नलिनी दिनेश आडपवार यांनी मतदारांनी दिलेल्या सहकार्य बद्दल आभार मानले आहेत.
आपण माझ्यावर जो विश्वास दाखविला त्यास तडा जाऊ देणार नाही असे नलिनी आडपवार यांनी आभार व्यक्त करताना म्हटले आहे.
काॅंग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढविली होती व त्यात त्या विजयी देखील झाल्या!
मुल शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील ती निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती.
अनेकांचे या कडे लक्ष वेधले होते.
कांग्रेस पक्षाने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून नगराध्यक्ष पद आपल्या ताब्यात ठेवले हे विशेष!
काँग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ ह्या बहुमताने नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्यात!
