
• भारतीय स्टेट बँक शाखा
तळोधीच्या वतीने अन्नदाता दिन साजरा
सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)
नागभीड (चंद्रपूर) : भारतीय स्टेट बँक शाखा तळोधीच्या वतीने सावरगाव येथे मंगळवार दि. 23 डिसेंबरला सार्वजनिक हनुमान मंदिरात राष्ट्रीय कृषी दिनाच्या निमित्ताने अन्नदाता दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांना शेतीसंबधांतील अनेक योजना आणि क्रॉप लोन बाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदरहु कार्यक्रमाला RBO चंद्रपूर क्षेत्रीय प्रबंधक भरत पाटील, तळोधीचे शाखा व्यवस्थापक के. डी. खानोरकर, हार्वेस्टरचे विक्रेते गणेश ठिकरे तसेच बँकेचे अधिकारी आयुष रावत, एफ. ओ .एस. ओमकार कोवे, मंगेश बारस्कर, दीपक मोहुर्ले, रामेश्वर मदनकर, ग्राहक सेवा केंद्र चालक दशरथ चन्ने, सुभाष गजभे, रफिक शेख, हेमंत साखरकर, निखिल घुगुस्कर, नलेश्वर मोहुर्ले, घुनेश्वर बोरकर,व शेतकरी बांधव उपस्थित होते.
