
⬛अंधार फार झाला!⬛
कुणी एक निर्भया
काळोख रात्री लुटली
संपला जीवनाचा प्रकाश
जगण्याची आशा सुटली..
खोलवर जखमा देवूनी
अत्याचार करत गेला
ठेविले कलेवर जिवंत
माणुसकी सोडूनि गेला…
जन्म दिले माता पित्याने
घातले संस्कार सदाचार
ही स्थिती बघवेना, परंतु
गुन्हेगार फिरती स्वैचार..
अंधकारमय या जीवनात
दाखवा कुणी प्रकाश दिवा
नका करू कुणाचा छळ
मुलगी म्हणुनी लाज ठेवा..
माता,मुलगी, बहीण, सून
अनेक रूपे तुचि असे
जन्म दिला त्या मातेचे
उपकार ठेवा सेवेचे मनसे..
⬛ सौ. शैला चिमड्यालवार सावली
